
इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेनं उडी घेत इराणच्या तीन अण्वस्त्र तळांना लक्ष्य केलं. यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायलच्या शहरांवर हल्ले केले आहेत. तेल अवीव, हायफासह अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज ऐकू आले. इस्रायलमधील बहुतांश शहरांमध्ये अलर्ट जारी केला आहे. इस्रायलच्या लष्कराने सांगितलं की, इराणने इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले आहेत. नागरिकांना विनंती आहे की होम फ्रंट कमांडच्या आदेशाचं पालन करावं. सध्या इस्रायलचं लष्कर धोका संपुष्टात आणण्यासाठी काम करत आहे.