Kabul News : तालिबानच्या तिघांवरील इनामाची रक्कम रद्द; अमेरिकेचा निर्णय, संघर्ष विसरण्याची तयारी
US cancels bounty on Taliban leaders 2025 : अमेरिकेने तालिबानच्या तीन वरिष्ठ नेत्यांवरील बक्षीस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अफगाणिस्तानमध्ये शांततेच्या दिशेने एक पाऊल मानला जात आहे.
काबूल : अमेरिकेने तीन वरिष्ठ तालिबानी म्होरक्यांना पकडून देण्यासाठी जाहीर केलेले बक्षीस रद्द केले आहे. यात अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्तेतील गृहमंत्री सिराजुद्दिन हक्कानीचा समावेश आहे.