अमेरिकी नागरिक चीनला न्यायालयात खेचणार

America
America

वॉशिंग्टन - कोरोना विषाणू संसर्गाची जागतिक साथ पसरविण्यास कारणीभूत ठरल्यावरून चीनला न्यायालयात खेचणे अमेरिकी नागरिकांना लवकरच शक्य होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर एकत्र आले असून त्यांनी सोमवारी विधेयक सादर केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्था मॅक््सॅली, मार्शा ब्लॅकबर्न, टॉम कॉटन, जॉश हॉली, माईक राऊंड््स आणि थॉम टिलीस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  कोरोना बळींसाठी नागरी न्याय कायदा (द सिव्हिल जस्टीस फॉर व्हिक्टीम्स ऑफ कोव्हिड अॅक्ट) असे विधेयकाचे नाव आहे. त्याद्वारे कोविडमुळे झालेल्या नुकसानास किंवा त्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरल्याचा दावा चीनविरुद्ध करता येईल. या कायद्यामुळे चीनशी संबंधित मालमत्ता गोठविणेही शक्य होईल.

9-11 चा संदर्भ
दहशतवादाचा फटका बसलेल्यांना कायदेशीर कारवाईचे जास्त मार्ग मिळावेत म्हणून 2016 मध्ये दहशतवाद पुरस्कर्त्यांविरुद्ध न्याय कायदा लागू करण्यात आला. प्रामुख्याने न्यूयॉर्कवर 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी याचा संदर्भ होता. त्याच धर्तीवर हे विधेयक आणण्यात आले आहे.

अमेरिकी जनतेच्या नुकसानास कारणीभूत ठरल्याची भरपाई देण्यास चीनला भाग पाडलेच पाहिजे. कोरोना साथीची माहिती लपविणाऱ्या आणि आता त्यापासून फायदा उकळणाऱ्या चीनी कम्युनिस्ट पक्षाला परिणामांची फळे भोगायलाच लावले पाहिजे.
- मार्शा ब्लॅकबर्न

कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात चीनला अपयश आहे. हा केवळ हलगर्जीपणाच नव्हे तर गुन्हेगारी स्वरूपाचा अपराध आहे.
- माईक राऊंड््स 

चीनचा खोटारडेपणा आणि लबाडीमुळे आपल्या प्रियजनांना गमावलेले, व्यवसायाचे नुकसान झालेले किंवा संसर्गामुळे वैयक्तिक इजा पोहोचलेल्या नागरीकांना आता चीनला जबाबदार ठरवून न्याय्य भरपाई मागता येईल.
- मार्था मॅकसॅली

कोरोनाचा जगाला इशारा देण्याचा प्रयत्न केलेले डॉक्टर आणि पत्रकार यांची तोंडे चीनने गप्प केली. परिणामी जगभर साथ पसरून पाच लाख बळी गेले आणि हा आकडा अजून वाढतोच आहे.
- टॉम कॉटन

चीनला जागतिक साथीबद्दल जबाबदार धरण्याचा अधिकार मिळण्याची पात्रता अमेरिकी नागरिकांकडे आहे. या विधेयकाला मुर्त स्वरुप मिळावे म्हणून माझ्या सहकाऱ्यांबरोबर सहभागी होण्याचा, त्यांच्या प्रयत्नांना हातभाल रावण्याचा मला विलक्षण अभिमान वाटतो.
- थॉम टिलीस

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com