esakal | ट्रम्प 'उल्लू'सारखे बुद्धिमान; अमेरिकी राजकीय भाष्यकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Tomi Lahren and donald trump.jpg

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापलं आहे.

ट्रम्प 'उल्लू'सारखे बुद्धिमान; अमेरिकी राजकीय भाष्यकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. अमेरिकेत भारतीय वंशाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन हे दोघेही प्रयत्न करत आहेत. अशात भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय विश्लेषक टोमी लाहरेन यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

कोरोना संसर्गाची दुसऱ्यांदा बाधा शक्य; पुरावा मिळाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा 

टोमी लाहरेन यांनी भारतीय मतदारांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची स्तुती करताना त्यांचा उल्लेख 'उल्लू' असा केला आहे. उदारमतवादी राजनीतीचा विरोध करणाऱ्या टोमी यांनी भारतीयांचे आभार मानले. त्यांनी यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वात अमेरिका पुन्हा महान बनेल, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्या हिंदीमध्ये म्हणाल्या की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प उल्लू सारखे बुद्धिमान आहेत. हिंदीत बोलून भारतीय मतदारांना आकर्षित करणाऱ्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण त्याच्या उलट घडून आलं आहे.

सोशल मीडियामध्ये उडवली जातेय खिल्ली

लाहरेन यांनी अज्ञानातून ट्रम्प यांना उल्लू म्हटलं. त्यांना माहित नव्हतं की भारतात उल्लू शब्दाचा अर्थ मूर्ख असा होता. उल्लू शब्द लोकांची खिल्ली उडवण्यासाठी वापरला जातो. त्यांच्या या चुकीच्या वक्तव्यामुळे सोशम मीडियात आता त्यांची खिल्ली उडवली जात आहे. अली असगर यांने लाहरेन यांचा या व्हिडिओ शेअर केला आहे. माझ्या भारतीय मित्रांनो टोमी लागरेन ट्रम्प यांना समर्थन देण्यासाठी तुमचे आभार मानत आहेत. जर तुम्ही बुद्धीमान आहात, तर हा व्हिडिओ नक्की पाहा, असं तो कॅप्शनमध्ये म्हणाला आहे.

प्रशांत भूषण माफी न मागण्यावर ठाम; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्रपतीपदावर विराजमान होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आहेत. बायडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उप-राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. बायडेन यांनी भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी हॅरिस यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं जात. अमेरिकेत 20 लाख भारतीय-अमेरिकी मतदार आहेत. 

(edited by- kartik pujari)
 

loading image
go to top