PM Modi In US : अमेरिकेच्या खासदाराची PM मोदींवर जहरी टीका! भाषणावर टाकणार बहिष्कार

US congress woman ilhan omar boycot pm modi address Criticize PM Modi government marathi news
US congress woman ilhan omar boycot pm modi address Criticize PM Modi government marathi news

पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान मोदी अनेक दिग्गजांची भेट घेणार आहेत, यासोबतच आज, २१ जून ते अमेरिकन काँग्रेसमध्ये ते संबोधित देखील करणार आहेत. मोदींच्या भाषणाकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे.

मात्र यादरम्यान अमेरिकेन काँग्रेसच्या सदस्य खासदार इल्हान अब्दुलाही उमर यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी ट्वीट करत नेरेंद्र मोदी यांना धार्मिक अल्पसंख्याकांवर दडपशाही करणारा नेता म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या सरकारने धार्मिक अल्पसंख्याकांवर दडपशाही केली आहे, हिंसक हिंदू राष्ट्रवादी गटांना प्रोत्साहन दिले आहे आणि पत्रकार/मानवाधिकार वकिलांना लक्ष्य केले आहे. मी मोदींच्या भाषणाला उपस्थित राहणार नाही. मोदींच्या दडपशाही आणि हिंसाचाराबद्दल चर्चा करण्यासाठी मी मानवाधिकार गटांसोबत एक ब्रीफिंग घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

US congress woman ilhan omar boycot pm modi address Criticize PM Modi government marathi news
Darshana Pawar : MPSC परीक्षेतील यशानंतर सत्कारासाठी दर्शना पुण्यात आली अन्…; अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितला घटनाक्रम

कोण आहेत इल्हान उमर?

इल्हान उमर २०१९ पासून मिनेसोटाच्या ५व्या कांग्रेसनल डिस्ट्रिक्टच्या अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. उमर यांचा जन्म सोमालिया येथे झाला असून त्या एक निर्वासीत आहेत.

प्रधानंत्री नरेंद्र मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात दुसऱ्यांदा संबोधित करणार आहेत. यापूर्वी त्यांनी जून २०१६ मध्ये देखील येथे भाषण केलं होतं. हा बहुमान मिळालेले ते एकमेव भारतीय नेते आहेत तर जगात त्यांचा चौथा क्रमांक लागतो.

US congress woman ilhan omar boycot pm modi address Criticize PM Modi government marathi news
Maharashtra Assembly Election : मुंबईवर राज्य कोणाचं? शिंदे गटाची हवा टाईट, ठाकरे गट जिंकणार 'इतक्या' जागा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com