हाफिज सईदचा पक्ष दहशतवादी संघटना; अमेरिकेची घोषणा

वृत्तसंस्था
Tuesday, 3 April 2018

मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड असलेल्या हाफीज सईदवर पाकिस्तानकडून यापूर्वीही निर्बंध आणण्यात आले आहेत. आता अमेरिकेने त्याने पाकिस्तान निवडणुकीत आपल्या पक्षाला उतरविण्याच्या तयारीला धक्काच दिला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या आगोदर अमेरिकेने दहशतवादी हाफीज सईदचा पक्ष मिल्ली मुस्लिम लीग पार्टी (एमएलएम) पक्षाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड असलेल्या हाफीज सईदवर पाकिस्तानकडून यापूर्वीही निर्बंध आणण्यात आले आहेत. आता अमेरिकेने त्याने पाकिस्तान निवडणुकीत आपल्या पक्षाला उतरविण्याच्या तयारीला धक्काच दिला आहे. त्याच्या मिल्ली मुस्लिम लीग पार्टी ही दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने एमएलएमच्या सात सदस्यांना परदेशी दहशतवादी संघटनांचे सदस्य म्हणून घोषित केले आहे.

याबरोबरच अमेरिकेने दहशतवादी संघटनांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये तेहरिक-ए-आझादी-ए-काश्मीर (टीएजेके) या संघटनेची नावही आहे. ही संघटना लष्करे तैयबाशी संबंधित आहे. ट्रम्प प्रशासनाने हे पक्ष कोणत्याही निर्बंधांशिवाय पाकिस्तानमध्ये काम करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणण्यात आली आहे. पाकिस्तानमधील निवडणुक आयोगानेही एमएलएमला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारकडून कायमच हाफीज सईदबाबत नरमाईचे धोरण राबविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US designates Hafiz Saeed political party MLM as terrorist outfit