esakal | मोठा दिलासा! अमेरिकेकडून भारतासाठी प्रवास नियम शिथिल
sakal

बोलून बातमी शोधा

plane

भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतासाठीच्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये बदल केला आहे.

मोठा दिलासा! अमेरिकेकडून भारतासाठी प्रवास नियम शिथिल

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

वॉशिग्टन: भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतासाठीच्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये बदल केला आहे. भारताला आता लेव्हल 4 मधून लेव्हल 3 मध्ये अपग्रेड करण्यात आलं आहे. लेव्हल तीननुसार प्रवासावर पुनर्विचार करण्यास सांगण्यात येते, तर लेव्हल चारनुसार प्रवासावर बंदी आणली जाते. सीडीसीने भारतासाठी लेव्हल 3 ची 'ट्रॅव्हल हेल्थ नोटिस' जारी केली आहे. (US eases travel advisory for India urges citizens to exercise caution corona virus )

सीडीसीने म्हटलंय की, 'एफडीएकडून मंजुरी मिळालेल्या लशीचा डोस घेतला असेल तर कोरोना विषाणूचे लक्षणं निर्माण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे महत्त्वाचं असेल तर तुम्ही प्रवास करु शकता. पण, त्याआधी सीडीसीने जारी केलेले नियम नक्की वाचा.' सीडीसीने लोकांना सल्ला दिलाय की, लेव्हल तीनमध्ये असलेल्या देशांनी प्रवास करण्याआधी पुनर्विचार करावा. देशात येणार असाल तर लस घेणे आवश्यक आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर अमेरिकेने भारताला लेव्हल चारमध्ये टाकले होते. त्यामुळे अमेरिकेतील प्रवासावर निर्बंध आले होते.

हेही वाचा: नेहरू-वडिलांचा फोटो शेअर करत सिंद्धूंची टीकाकारांना चपराक

भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. देशात दररोज 50 हजारांच्या आत कोरोना रुग्णसंख्या आढळत आहे. काही दिवसांपूर्वी देशात 3 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी भारतीय नागरिकांना देशात येण्यास बंदी घातली होती. पण, आता दुसरी लाट ओसरली असून भारतातील रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे अनेक देशांनी भारतातील नागरिकांच्या प्रवासावरील बंदी उठवली आहे. युरोपातील जवळपास 15 देशांनी कोविशिल्ड लशीचा डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेशाला मंजुरी दिली आहे.

सोमवारी देशात 30 हजार 93 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 45 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मृताची संख्यामध्येही मोठी घट पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांतील कोरोना आकडेवारीनुसार, दुसरी लाट ओसरली असल्याची चिन्हे आहेत. मात्र कोरोनाचा धोका कायम आहे.

loading image