अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सावरू - डोनाल्ड ट्रम्प

पीटीआय
Thursday, 29 October 2020

इतिहातासील ही सर्वांत मोठी वाढ असेल, काही लोक याची खिल्ली उडवीत आहेत पण त्याला पर्याय नाही असे ट्रम्प यांनी सांगताना लॉकडाउन काढण्याच्या सरकारच्या निर्णयाचे देखील समर्थन केले. 

मिलवाउकी - यंदाची अध्यक्षपदाची निवडणूक ही आपल्या प्रशासनाने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केलेले प्रयत्न विरुद्ध बायडेनप्रणीत मंदी अशी असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.  

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मतदान अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचा वारू चौफेर उधळू लागला आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी तीन सभा घेतल्या. मिशिगन, विस्कॉन्सिन आणि नेब्रास्का या राज्यांतील वातावरण त्यांनी ढवळून काढले. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आम्ही करांत वाढ करणार आहोत. इतिहातासील ही सर्वांत मोठी वाढ असेल, काही लोक याची खिल्ली उडवीत आहेत पण त्याला पर्याय नाही असे ट्रम्प यांनी सांगताना लॉकडाउन काढण्याच्या सरकारच्या निर्णयाचे देखील समर्थन केले. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनापेक्षाही अमेरिकेची अंगभूत प्रेरणा ही अधिक शक्तिशाली असून, ट्रम्प हे लढवय्ये आहेत. ट्रम्प यांचे या देशावर प्रेम असून, ते दररोज लोकांसाठी संघर्ष करतात.
- मेलानिया ट्रम्प, फर्स्ट लेडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US economy recovers says Donald Trump