esakal | US Election : चुरशीच्या मतदानाला प्रारंभ; मध्यरात्री नोंदवले गेले पहिले मत 
sakal

बोलून बातमी शोधा

us election 2020

आज अमेरिकेचे नागरिक डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या जो बायडेन यांच्यासाठी मतदान करुन अमेरिकेचे भविष्य निर्धारित करतील.

US Election : चुरशीच्या मतदानाला प्रारंभ; मध्यरात्री नोंदवले गेले पहिले मत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगभरात महत्त्वाची मानली जाणारी अमेरिकेच्या राष्ट्रधक्ष्य पदाच्या निवडणुकीला आता प्रारंभ झाला आहे. अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू हॅम्पशायरमधील शहरांमधील डिक्सविले नॉच आणि मिल्सफील्ड येथे पहिल्या मतपत्रिकेद्वारे मत नोंदवण्यात आले आहे. ही निवडणूक बहुप्रतिक्षित होती. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी तगडे आव्हान उभे केलं आहे. मध्यरात्री मतदानाची सुरुवात झाली असून आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी, न्यू हॅम्पशायर गव्हर्नर पदासाठी तसेच फेडरल आणि राज्य विधानसभेच्या जागांसाठी मतदारांनी मतदान केलं आहे.

डिक्सविले नॉचच्या बालसमस रिसॉर्टमधील 'बेलेट रूम' मध्ये काम करणा-या लेस ओटेन या स्थानिक पाच नोंदणीकृत मतदारांपैकी एकाने हे पहिले मत नोंदवले आहे. जगभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशातच जगातील महत्वाची मानली जाणारी ही निवडणूक कोरोनाचे आव्हान समोर असताना पार पाडली जात आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक हाहाकार अमेरिकेतच पहायला मिळाला आहे. 

हेही वाचा - ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला, 7 जण ठार
आज अमेरिकेचे नागरिक राष्ट्राचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या जो बायडेन यांच्यासाठी मतदान करुन अमेरिकेचे भविष्य निर्धारित करतील. एकूण 583 पैकी निर्विवादपणे जिंकण्यासाठी ट्रम्प किंवा बायडेन यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवावी लागतील. त्यामुळे अध्यक्षपदासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 270 मतदारांची मते मिळणे आवश्यक आहे.
2020 च्या या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक पुढे आहेत, असे निवडणुकीपुर्वीचे अनेक अंदाज सांगता आहेत. जर  बायडेन निवडून आले तर ते अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांचे वय आता 78 वर्षे आहे. ट्रम्प हेसुद्धा या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आले तर ते देखील सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरतील. त्यांचे वय आता 74 वर्षे आहे. 

हेही वाचा - US Election: निवडणुकीनंतर हिंसाचाराची भीती; नागरिकांनी दरवाजे, खिडक्या प्लायवूडने केले बंद

मात्र, निवडणुकपूर्व सर्वेक्षणात आघाडी घेतल्यामुळे निकाल स्पष्ट होत नाही. कारण, मागच्या निवडणुकीत देखील डेमोक्रॅटीक पक्षाच्या हिलरी क्लिंटन या अनेक सर्वेक्षणात आघाडीवर होत्या मात्र तरीही त्या 2016 सालची राष्ट्रध्यक्ष पदाची निवडणूक हरल्या होत्या. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात डोनाल्ड ट्रम्प अयशस्वी ठरल्यावरुन त्यांच्याविरोधात रोष आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात ट्रम्प हे बेरोजगारी कमी करण्यात आणि वर्णद्वेषाचा मुद्दा हाताळण्यात कमी पडले असल्याचंही बोललं जात आहे. जो बायडेन हे सध्या  डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा प्रभावी जाणवत असले तरीही निवडणुकीनंतरच याबाबतचा निर्णय स्पष्ट होईल. 

loading image