US Election 2020 : ट्रम्प यांना धक्का; पेन्सिल्वेनियात आघाडीमुळे बायडेन यांचा विजय निश्चित

US_Biden_Trump
US_Biden_Trump

US Election 2020 : वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याच गळ्यात विजयी माळ पडेल, अशी चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी असलेल्या जॉर्जियामध्ये बायडेन आघाडीवर असून बायडेन यांच्या समर्थकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. 

पेनसिल्वानियामध्येही बायडेन यांनी ट्रम्प यांना मागे टाकल्याचे हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. येथे विजय मिळाल्यास बायडेन याचा व्हाईट हाऊसचा रस्ता आणखी मोकळा होणार आहे. मतमोजणी अद्याप बाकी आहे, मात्र सीएनएन आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार, बायडेन यांनी प्रतिस्पर्धी ट्रम्प यांना ५५०० मतांनी मागे टाकले आहे. बायडेन यांच्याकडे २५३ इलेक्टोरल मते असून व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना २७० हा जादूई आकडा पार करावा लागणार आहे. 

जर पेनसिल्वानिया आणि आणखी २० इलेक्टोरल मते जिंकल्यास बायडेन या मोठ्या लढाईत विजयी होतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०१६च्या निवडणुकीत पेनसिल्वानियाममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला होता. जॉर्जिया आणि नेवाडा या प्रमुख राज्यांमध्येही बायडेन आघाडीवर आहेत. ट्रम्प यांना जॉर्जियामध्ये विजय मिळविणेही तितकेच आवश्यक आहे. कारण हा भाग रिपब्लिकनचा गड म्हणून ओळखला जातो. पण इथेही बायडेन आघाडीवर असल्याचे दिसून येते. बायडेन यांच्याकडे ९१७ मतांची आघाडी आहे. 

अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी आवश्यक असलेल्या २७० इलेक्टोरल वोटच्या दिशेने बायडेन यांची वाटचाल सुरू आहे. त्यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनमध्ये विजय मिळविला आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com