बायडेन-ट्रम्प वादविवादात 'शट अप'; डिबेटमध्ये कोण ठरलं वरचढ?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 September 2020

अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात बुधवारी पहिला वादविवाद झाला.

वॉशिंग्टन- अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात बुधवारी पहिला वादविवाद झाला. दोन्ही उमेदवारांनी आरोग्य, न्याय, वर्णभेद, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्यावर आपली भूमिका मांडली. कोविड-१९ महामारीबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, माझ्या जागी बायडेन असते तर अमेरिकेत मृत्युची संख्या अधिक राहिली असती. भारतानेही मृत्युची संख्या लपवली आहे, असा आरोप केला. त्याचवेळी बायडेन यांनी महामारीचा मुकाबला करण्यासाठी ट्म्प यांच्याकडे कोणतिही योजना नव्हती, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशाची नियुक्ती, पर्यावरण बदलामुळे ॲमझॉनच्या जंगलात पेटणारे वणवे यासारखे मुद्देही वादविवादात होते.

HIVतून पूर्णपणे बरा झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीचा कँसरमुळे मृत्यू

कोरोनाचा मुद्दा

ट्रम्प: कोरोनाबाबत चीनची चूक असून अमेरिकेने अभूतपूर्व काम केल्याने गर्व्हनर मंडळींकडून आपले कौतुक झाले आहे. तुम्हाला माहित नाही की भारत, चीन आणि रशियात किती जण मृत्युमुखी पडले. भारत, चीन आणि रशिया मृतांची संख्या दडवत आहेत. ट्रम्प सरकारने चांगले काम केले आहे. कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी मास्क, पीपीई कीट आणि औषधे आणली. आठवडाभरातच कोरोनावर लस तयार होईल. याबाबत कंपन्यांशी चर्चा केली असून लवकरच लस आणू.
क्रिस वॅलेस : गर्दी जमवणाऱ्या सभा आपण का घेत आहात
ट्रम्प : एवढी गर्दी जमली असती तर बायडेन यांनी देखील सभा घेतली असती. बायडेन तर २०० फुटावर थांबतात, तरीही मोठा मास्क घालून येतात.
बायडेन : कोरोनावर उपाय करण्यासाठी तुमच्याकडे (ट्रम्प) कोणतिही ठोस योजना नव्हती. आपण हाताला ब्लिचचे इंजेक्शन टोचून घ्या. कदाचित कोरोना बरा होईल.
ट्रम्प : ही गोष्ट मी आवेशात बोललो होतो आणि ते तुम्हाला ठावूक आहे.

करचुकवेगिरी

क्रिस वॅलेस: कोरोना महामारी आणि लॉकडाउननंतर अमेरिकी अर्थव्यवस्था कशी रुळावर आणणार
ट्रम्प : लॉकडाउननंतर अमेरिकी अर्थव्यवस्था अपेक्षापेक्षा अधिक वेगाने रुळावर येत आहे. अमेरिकी इतिहासातील सर्वात चांगली अर्थव्यवस्थेची उभारणी आपल्या काळात झाली आहे.
वॅलेस: ७५० डॉलर कराचे काय
ट्रम्प : मी लाखो डॉलरचा कर भरला आहे. त्यावर्षी मी ३८ दशलक्ष डॉलर कर भरला. दुसऱ्या वर्षी २७ दशलक्ष डॉलर भरले. करचुकवेगिरीची ती बातमी खोटी आहे.

अमेरिकेतील आंदोलन

क्रिस वॉलेस : जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येबाबत काय म्हणणे
ट्रम्प : ओबामा-बायडेन यांच्या काळातही वर्णभेद होता आणि हिंसाचार होत होते. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे.
बायडेन : देशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे.
ट्रम्प : बायडेन हे कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्‍वास ठेवत नाहीत. आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्‍वास ठेवतो, परंतु तुम्ही नाही. नागरिकांना न्यायव्यवस्था हवी आहे.
बायडेन : आंदोलनात कोणताही दोष नसतो, परंतु हिंसा मान्य नाही.

पॅरिसमध्ये मोठा स्फोट? स्थानिक पोलिसांनी केला खुलासा 

नागरिकांनी मत का द्यावे

ट्रम्प : आमच्या सरकारने चांगले प्रशासकीय कामकाज केले आहे. कोरोना येण्यापूर्वी विकासाच्या मार्गावर होतो आणि त्यास धक्का लागला आहे. आमचा कार्यकाळ संपण्यापूर्वी न्यायधीशांची संख्या वाढली आहे. मी जेव्हा सत्तेत आलो तेव्हा न्यायधीशांच्या १२८ जागा रिक्त होत्या. मागील सरकार कमकुवत होते, आमचे सरकार मजबूत आहे.
बायडेन : ट्रम्प यांच्या राजवटीत अमेरिकी अधिक असुरक्षित आणि गरीब होती. त्यांच्या काळात श्रीमंत अधिक श्रीमंत होतील आणि गरीब हे अधिक गरीब होती.

वादविवादात ‘शट अप’

वादविवादादरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन हे एकेमकांशी हुज्जत घालत होते. दोघेही एकमेकांना ‘शट-अप’ देखील म्हणत होते. यावेळी क्रिस वॉलेस यांना मध्यस्थी करून दोघांना शांत करत होते. अनेक मुद्यावर ते एकमेकांना दुषणं देत होती. हा वाद एवढा वाढायचा की क्रिस वॉलेस यांना एकदा दोघांनाही ‘स्टॉप टॉकिंग’ असे म्हणावे लागले. वादविवादरम्यान एकदा बायडेन यांनी ट्रम्प यांना मध्येच रोखले तेव्हा वॉलेस म्हणाले, त्यांना त्यांचे म्हणणे पूर्णपणे मांडू द्या. एकदा ट्रम्प बायडेनला म्हणाले की, आपण स्वत:ला माझ्यासमोर स्मार्ट समजू नका. आपण माझ्यासमोर स्मार्ट शब्दचा वापर करु नका.

ठळक बाबी

संसर्गामुळे दोघांनी एकमेकांना हातमिळवणी नाही.
हा वादविवाद मर्यादित संख्येत पार पाडला.
चर्चेदरम्यान श्रोत्यांना आरडाओरड करण्यास मनाई

कोठे झाला वादविवाद
ओहयोच्या क्लिवलँड

किती वेळ चालला
९० मिनिटे

वादविवादाचे संयोजक
फॉक्स न्यूजचे ७२ वर्षीय ॲकर क्रिस वॅलेस

उपस्थिती
ट्रम्प यांची पत्नी मेलनिया ट्रम्प आणि बायडेन यांची पत्नी जिल बायडेन. ट्रम्प यांची कन्या इव्हांका आणि स्टिफनी ट्रम्प


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump and joe biden debate for president post