ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा मार्ग खडतर; विरोधी उमेदवारापेक्षा तब्बल इतक्या गुणांनी पिछाडीवर

US election Biden ahead of Trump by 14 points
US election Biden ahead of Trump by 14 points

वॉशिंग्टन- 'द न्यूयॉर्क टाईम्स'च्या नव्या सर्वेक्षणानुसार रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षीय निवडणुकीत पिछाडी होत असल्याचं दिसत आहे. सर्वेक्षणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यापेक्षा 14 टक्के कमी गुण मिळाले आहेत.  त्यामुळे ट्रम्प यांचा पुन्हा राष्ट्रपती होण्याचा मार्ग खडतर असणार आहे.

नोव्हेंबरच्या निवडणुकीत जो बायडेन यांना 50 टक्के मतं मिळतील, तर डोनाल्ड ट्रम्प यांना 36 टक्के मतांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच महिला आणि अल्पसंख्याक मतदारांचा पाठिंबा बायडेन यांना वाढत असल्याचं या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या या नव्या सर्वेक्षणात बायडेन आणि ट्रम्प यांच्यातील 14 टक्क्यांचे अंतर आतापर्यंतचे सर्वाधिक दाखवण्यात आले आहे. 

काय आहे राजीव गांधी फाउंडेशन? चीनकडून पैसे घेतल्याचा भाजपने केलाय आरोप
अमेरिकेला सध्या असामान्य आणि अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, कोरोना महामारीचा उद्रेक आणि वर्णभेदाविरोधात होत असलेली आंदोलने यामुळे ट्रम्प यांना एकाच वेळी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व पातळ्यांवर येत असलेल्या अपयशामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता कमालीची घटली आहे. रिपब्लिकन पक्षाचा पारंपरिक मतदारही ट्रम्प यांच्या विरोधात जात असल्याचं सध्याचं चित्र आहे.

'द न्यूयॉर्क टाईम्स'चे सर्वेक्षण सिएना कॉलेज रिसर्च इन्स्टिट्युटमार्फत (SCRI) घेतले जाते. यात अमेरिकेत निर्माण झालेल्या गंभीर परस्थितीमुळे मतदारांनी ट्रम्प यांच्याकडे पाठ फिरवल्याचं सांगण्यात आलं आहे. तर जो बायडेन यांना मोठ्या प्रमाणात अमेरिकी लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 2016 मध्ये हिलरी क्लिंटन यांना मिळाला नाही, तेवढा पाठिंबा बायडेन यांना मिळत आहे. विशेष करुन महिला, तरुण आणि अल्पसंख्याक बायडेन यांना साथ देत असल्याचं सर्वेक्षणात म्हणण्यात आलं आहे.

चला वारीला : रंगती भारुडे आनंदाचा ठेवा, आली पंढरी केला मनोमन धावा
ट्रम्प यांना श्वेतवर्णीय अमेरिकन पुरुषांचा पाठिंबा मात्र कायम आहे. पदवी नसलेल्या तरुणांनीही ट्रम्प यांनाच पसंती दिली आहे.  असे असले तरी अमेरिकेत करण्यात आलेल्या विविध संस्थांच्या सर्वेक्षणात जो बायडेन यांनाच अधिक पसंती मिळत आहे. बायडेन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आघाडीवर आहेत. 

दरम्यान, 3 नोब्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन समोरासमोर आहेत. 2016 साली ट्रम्प यांनी धक्कादायकरीत्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com