बायडेन यांचा ट्रॅम्पना धोबीपछाड?

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 22 September 2020

अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रंगत वाढत आहे

वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रंगत वाढत असून अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यातील लढत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. ‘फाईव्ह थर्टी एट’ (५३८) या अमेरिकेच्या मतदान सर्वेक्षणाचे विश्लेषण करणाऱ्या संस्थेच्या ताज्या सर्वेक्षणात २०२० च्या निवडणुकीत बायडेन यांच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या अहवालात २०१६ मधील निवडणुकीचा संदर्भ दिला असून त्या वेळीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन ट्रम्प यांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविली होती, पण ऐनवेळी फासे उलटे पडले होते.

चीनची होतेय थट्टा; हॉलिवूडमधील क्लिप्स दाखवून केला अमेरिकेवर हल्ल्याचा दावा

४० हजार वेळा सराव निवडणूक

‘फाईव्ह थर्टी एट’ वेगळ्या प्रकारे सर्वेक्षण केले. त्यांनी ४० हजार वेळा सराव निवडणूक घेऊन कोणता उमेदवार सर्वाधिक वेळा जिंकतो, हे पाहिले. यासाठी वेगवेगळ्या मुद्यांवर लक्ष केंद्रित केले. १०० सराव निवडणुकीत बायडेन ७७ वेळा विजयी झाले तर ट्रम्प केवळ २३ वेळा जिंकले. सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची ४७ ते ५४ जागा जिंकण्याची शक्यता ८० टक्के आहे.

खाद्यतेलांची आयात मंदावली; पेट्रोल- डिझेलपाठोपाठ ग्राहकांवर नवा भार

अनेक राज्यांची बायडेन यांना पसंती

सर्वेक्षणानुसार कोलंबिया, व्हर्मांन्ट, हवाई, मॅसेच्युसेट्स, कॅलिफोर्निया, मेरीलँड, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, रोड आयर्लंड आदी राज्यांमध्ये बायडेन यांना पसंती असल्याचे दिसते. नेब्रास्का, व्योमिंग, वेस्ट व्हर्जिनिया, ओक्लाहोमा, इडाहो, नॉर्थ डाकोटा, केंटुकी या राज्यांमध्ये ट्रम्प यांना पुढे आहेत. लोकप्रिय मतांचा विचार करता बायडेन यांना ५२. ८ टक्के तर ट्रम्प यांना ४५.९ टक्के मते मिळू शकतात.

न्यायाधीशांच्या निधनाचा परिणाम

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रुथ बिडर गिन्सबर्ग यांच्या निधनाचा निर्णायक परिणाम निवडणुकीवर पडू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election joe biden lead over donald trump