esakal | US Election 2020: पराभव झाला तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिका सोडणार का ?
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump main.jpg

मला गंमत करायची नाही. कारण राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या इतिहासात सर्वात वाईट उमेदवाराविरोधात लढण्याचा माझ्यावर दबाव आहे.

US Election 2020: पराभव झाला तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिका सोडणार का ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन- 'मेक अमेरिका, ग्रेट अगेन' ही घोषणा देत अमेरिकेत सत्ता मिळवणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मतमोजणीत सध्या पिछाडीवर दिसत आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत जो बायडन यांना 264 आणि ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोरल मते मिळाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत झाले तर अमेरिका सोडतील का ? या चर्चेला ऊत आला आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी पराभव झाल्यास देश सोडू असे म्हटले होते. 

यापूर्वी ट्रम्प यांनी जॉर्जिया येथील प्रचारसभेत म्हटले होते की, जर मी 3 नोव्हेंबर रोजी बायडन यांच्याकडून पराभूत झालो तर कदाचित मला देश सोडावा लागेल. मला गंमत करायची नाही. कारण राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या इतिहासात सर्वात वाईट उमेदवाराविरोधात लढण्याचा माझ्यावर दबाव आहे. मी हरलो तर आपण विचार करू शकता? संपूर्ण जीवनात मी काय करायला जात आहे? मी म्हणेन की, राजकारणाच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवाराकडून माझा पराभव झाला. मला ते अजिबात आवडणार नाही, असे ते म्हणाले होते. 

हेही वाचा- US Election 2020 : निकालासाठी वाट बघा...

कदाचित मला देश सोडावा लागेल ? मला माहीत नाही. जर बायडन सत्तेत आले तर ते देश कम्युनिझममध्ये बदलतील आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या स्थलांतराचा पूर येईल. बायडन यांचे कुटुंब गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर बायडन यांनीही ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला होता. 

हेही वाचा- US Election: बायडन यांनी मोडले ओबामांपासून ते क्लिंटनपर्यंतचे सर्व विक्रम

हे वचन आहे का असा सवाल ही बायडन यांनी टि्वट करत विचारला होता. तसा व्हिडिओही त्यांनी शेअर केला होता. निवडणुकीतील वाईट कामगिरीनंतर आता सोशल मीडियावर ट्रम्प यांना यावरुन ट्रोल केले जात आहे. पराभव झाल्यानंतर ट्रम्प देश सोडणार का असा सवाल करत आहेत. 
 

loading image
go to top