esakal | US Election: बायडन यांनी मोडले ओबामांपासून ते क्लिंटनपर्यंतचे सर्व विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

joe biden main.jpg

डेमोक्रॅटिकचे उमेदवार बायडन यांनी अमेरिकेतील इतिहासात आतापर्यंतची सर्वाधिक मते मिळवली आहेत.

US Election: बायडन यांनी मोडले ओबामांपासून ते क्लिंटनपर्यंतचे सर्व विक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन बाजी मारताना दिसत आहेत. बायडन यांना विजयासाठी आवश्यक असलेल्या 270 इलेक्ट्रोरल मतांपैकी 264 मते मिळाली आहे. त्यांना केवळ 6 मतांची गरज आहे. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 मते पडली आहेत. यादरम्यान बायडन यांनी एक असाही विक्रम केला आहे, जो अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याच राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवाराने बनवलेला नाही. 

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, डेमोक्रॅटिकचे उमेदवार बायडन यांनी अमेरिकेतील इतिहासात आतापर्यंतची सर्वाधिक मते मिळवली आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत सुमारे 70 मिलियनहून अधिक मते मिळवून बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही विक्रम मोडला आहे. 

हेही वाचा- US Election Result 2020: भारतीय वंशाचे श्रीनिवास कुलकर्णी पराभूत

नॅशनल पब्लिक रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत जे निकाल समोर आले आहेत, त्यानुसार बायडन यांना 72,049,341 मते मिळाली आहेत. एवढी मते राष्ट्राध्यक्षपदाच्या कोणत्याही उमेदवाराला आतापर्यंत मिळालेली नाहीत. यापूर्वी वर्ष 2008 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 69,498,516 मते मिळाली होती. जो आजपर्यंतचा विक्रम होता. परंतु, बायडन यांनी त्यांच्याहून अधिक मते मिळवत विक्रम केला आहे. 

हेही वाचा- US Election - ट्रम्प यांचा अमेरिकेतील 'युपी'मध्ये विजय; बायडेन यांची एरिझोनामध्ये मुसंडी

परंतु, सध्या अमेरिकेची धुरा पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात असेल की जो बायडेन सत्ता सांभाळतील याचा निर्णय मतमोजणीतूनच समोर येईल. आतापर्यंतच्या मतमोजणीत बायडन हे इलेक्टोरल मतांबरोबरच सुमारे 34,63,182 मतांनी आघाडीवर जात आहेत. मतांच्या टक्केवारीतही सुमारे 4 टक्क्यांचे अंतर दिसत आहे. 

हेही वाचा- US Election : गेल्या 100 वर्षांतील सर्वाधिक मतदान; ट्रम्प-बायडेन यांच्यात चुरशीची टक्कर

एनपीआरच्या मते, आतापर्यंत कोट्यवधी मतांची मोजणी बाकी आहे. यामध्ये कॅलिफोर्नियाचाही समावेश आहे. कॅलिफोर्नियात आतापर्यंत सुमारे 64 टक्क्यांची मोजणी झाली आहे. ट्रम्प यांना 68,586,160 मते मिळाली आहेत. जी ओबामांच्या मतांजवळ आहे. ट्रम्प हे ओबामाच्या मतांशी बरोबरी करु शकतात. 

loading image
go to top