US flights news: मोठा दिलासा! अमेरिकेत विमान उड्डाणांना टप्प्याटप्प्यानं सुरुवात

काही तासांपूर्वी अमेरिकेच्या विमान उड्डाण यंत्रणेत बिघाड झाल्यानं सर्व उड्डाण थांबवण्यात आली होती.
US flights news
US flights news

वॉशिंग्टन : विमान उड्डाणांवर नियंत्रण ठेवणाऱ्या अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स नोटीस टू एअर मिशन्स (NOTAM) सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानं अमेरिकेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यामध्ये अमेरिकेतील सर्व विमान उड्डाणं थांबवण्यात आली होती. पण आता ही परिस्थिती नियंत्रणात येत असून विमानांची उड्डाणही हळूहळू सुरु झाली आहेत, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन्सनं (FAA) हे स्पष्ट केलं आहे. (US flights news Air traffic operations resuming gradually across airports says FAA)

सुरुवातीला निर्माण झालेल्या उड्डाणांचा गोंधळ मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत पण अद्याप हा प्रॉब्लेम कशामुळं झाला होता हे कळू शकलेलं नाही. FAAनं हे देखील सांगितलंय की, जमिनीवर असलेल्या विमानांची उड्डाणंही सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळं हळूहळू हवाई ट्रॅफिक सुरु करण्यात येत आहे. त्याचबरोबर एअर मिशन्स सिस्टिमला सुरक्षेसंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

US flights news
अमेरिकेत गोंधळ! विमान उड्डाणं नियंत्रित करणारी 'NOTAM' काय आहे? जाणून घ्या

दरम्यान, यापूर्वी FAAनं सांगितलं होतं की, अटलांटा आणि न्यूवार्क लिबर्टी इंटरनॅशनल एअरपोर्टमधून डिपार्चर्स पुन्हा सुरु झाली आहेत. एअर सिस्टिमध्ये झालेल्या बिघाडामुळं सुमारे ३,७०० फ्लाईट्सना उशीर झाला आहे. तर ६४० विमानांची उड्डाणं रद्द करावी लागली होती.

हेही वाचा - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानं विमानांची उड्डाण रोखून ती जमिनीवरच थांबवणं गरजेचं असल्याचं NOTAMनं म्हटलं आहे. दरम्यान, आम्ही आता शेवटचं सिस्टिम चेकिंग करत आहोत, असंही FAAनं स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com