Florida Shooting : फ्लोरिडामध्ये वांशिक हल्ल्यात तीघांचा मृत्यू; हल्लेखोराने स्वतःलाही उडवले

US Florida shooting  Gunman kills three himself in racially motivated shooting several people injured
US Florida shooting Gunman kills three himself in racially motivated shooting several people injured

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये शनिवारी एका जनरल स्टोअरमध्ये तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा हल्ला वांशिक हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्लेखोर कृष्णवर्णीय लोकांचा तिरस्कार करत असल्याने हा वांशिक हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, हल्ल्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर देखील गोळी झाडली. प्राथमिक तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हल्लेखोर द्वेषयुक्त विचारसरणीने प्रभावित होता, हेच या हल्ल्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जॅक्सनव्हिलमध्ये झालेल्या हल्ल्यात किती लोक जखमी झाले याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

US Florida shooting  Gunman kills three himself in racially motivated shooting several people injured
Delhi airport: विमान प्रवास करताय! G-20 संमेलनाच्या निमित्त 160 फ्लाईट रद्द

बोस्टनमध्ये परेड दरम्यान गोळीबार

अमेरिकेतील बोस्टन येथे शनिवारी सकाळी प्रसिद्ध बोस्टन परेड दरम्यान गोळीबार झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या गोळीबारात सात जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी गोळीबार झाल्याने परेड थांबवावी लागली. पोलिसांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कोणाच्याही जीवाला धोका नाही. या घटनेनंतर दोन संशयितांना अटक करण्यात आली असून शस्त्रेही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

US Florida shooting  Gunman kills three himself in racially motivated shooting several people injured
NCP Ajit Pawar : अनेकांनी टोप्या घातल्या आणि हाताला किसही केल...अजित पवारांची फटकेबाजी...

बॉस्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जॉवेर्ट परेड दरम्यान हा प्रकार झाला, ही परेड शगरातील प्रमुख कॅरेबियन कार्निव्हलचा भाग आहे. दरम्यान पोलिस आयुक्त मायकल कॉक्स यांनी स्पष्ट केलं खी गोळीबार हा गोळीबार परेडच्या वेळी झाला नसून जवळच्या परिसरात झाला. गोळीबारामुळे परेड थांबवण्यात आल्याचे देखील कॉक्स यांनी सांगितले. गोळीबाराचा त्या कार्यक्रमाशी काहीही संबंध नव्हता असंही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com