NCP Ajit Pawar : अनेकांनी टोप्या घातल्या आणि हाताला किसही केल...अजित पवारांची फटकेबाजी...

अजित पवार यांनी आपल्या शैलीत आज बारामतीकरांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागतावर प्रतिक्रीया दिली
ajit pawar over warm welcome at baramati maharashtra politics pune
ajit pawar over warm welcome at baramati maharashtra politics punesakal
Updated on

बारामती - महायुतीसोबत जात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दोन महिन्यानंतर बारामतीकरांसमोर आलेल्या अजित पवार यांनी आज नागरी सत्काराला उत्तर देताना आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली. आपल्या मोकळया शैलीत मते व्यक्त करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या अजित पवार यांनी आजही बारामतीकरांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागतावर प्रतिक्रीया दिली.

माझ्या आयुष्यात इतकी उत्स्फूर्तपणे काढलेली मिरवणूक मी तरी पाहिली नाही, अशा शब्दात वर्णन करताना अजित पवार म्हणाले, लोकांच्या हातात हात देताना इतके लोक दोन्ही हात हातात घेत होते की खांद्यापासून हात तुटतोय की काय अस वाटत होत.

काही बहाद्दरांनी हाताचे मुके घेतले...किस केल किस....आज तर अनेकांनी इतक्या टोप्या घातल्या, मला आयुष्यात कधी कुणी इतक्या टोप्या घातल्या नाहीत. हे सगळ होताना मी मनातल्या मनात म्हणत होत आज अजिबात चिडायच नाही...चिडायच नाही...सगळ्यांना फक्त हातच जोडत होतो.

विधानसभेच्या निवडणुकीत 1 लाख 68 हजारांचं मताधिक्य दिलं. समोरच्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त केलं. असं केल्यानंतर मी काय करायचं? त्यामुळे मी पहाटे 5 वाजताच बावचळून उठतो आणि कामाला लागतोय. बायको म्हणते दमान घ्या हे काय चाललंय? जरा वयाचा विचार करा. पण वय वगैरे काही नसतं. कामामधून वेगळंच समाधान मिळतं.

प्रोटोकॉल बाजूला सारुन स्विकारल स्वागत...

उपमुख्यमंत्री म्हणून असलेली सुरक्षा व्यवस्था व प्रोटोकॉल दूर सारत अजित पवार यांनी आज लोकांचे स्वागत स्विकारले. आजच्या अजित पवारांच्या सभेला प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांना जागाच मिळत नव्हती. सभास्थानीही सुरक्षेसाठी असलेल्या डी मधून युवकांना पोलिस बाहेर काढताना स्वताः अजित पवार यांनी उठून पोलिसांना थांबवत युवकांना तिथेच बसायला जागा करुन द्यायला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com