esakal | भारताविरोधात कट करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने दिला दणका
sakal

बोलून बातमी शोधा

The US foiled Pakistans plot against India

पाकिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवायांमागे भारताचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तान करत होता. मात्र, दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर भारताला गुंतविण्याच्या पाकिस्तानच्या योजनेला अमेरिकेने धुडकावून लावले आहे. 

भारताविरोधात कट करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने दिला दणका

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची भारताच्या विरोधातील प्रस्ताव सादर करण्याची मागणी अमेरिकेने फेटाळून लावत पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. त्यामुळे पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. पाकिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवायांमागे भारताचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तान करत होता. मात्र, दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर भारताला गुंतविण्याच्या पाकिस्तानच्या योजनेला अमेरिकेने धुडकावून लावले आहे. 

सर्वात मोठी बातमी - चीनी हॅकर्सकडून 5 दिवसात 40 हजार सायबर हल्ले...
शुक्रवारी अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या सर्व सदस्यांना औपचारिकपणे कळविले की ते पाकिस्तानच्या प्रस्तावाला अधिकृतपणे फेटाळून लावत आहेत. या प्रस्तावाच्या माध्यमातून पाकिस्तानने अफगाणिस्तानात स्थित भारतीय बांधकाम अभियंता वेणू माधव डोंगारा यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा डाव रचला होता. 
डोंगारा हे त्या चार भारतीय नागरिकांपैकी एक आहेत ज्यांचे नाव पाकिस्तानने आपल्या प्रदेशातील दहशतवादी कारवायांशी जोडले आहे.

भारत आणि चीन वादामध्ये कुणाला साथ देणार? रशियाकडून आलं मोठं वक्तव्य
डोंगारा यांना यूएनएससीमध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी पाकिस्तानने चीनची मदत घेतली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेने हा प्रस्ताव तांत्रिक कारण समोर करत प्रलंबित ठेवला होता. तसेच पाकिस्तान डोंगारा यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावे सादर करेल अशी अपेक्षाही अमेरिकेने व्यक्त केली होती. मात्र, पाकिस्तान डोंगारा यांच्या विरोधात पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानच्या प्रस्तावाला सादर करण्याची मागणी फेटाळून लावली. 

टेनिस जगतात खळबळ : नंबर वन टेनिस स्टार जोकोविचला कोरोनाची लागण
जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेवर संयुक्त राष्ट्राने बंदी घालत संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्यानंतर पाकिस्तानने हा कट रचला होता. मात्र, हा प्रस्ताव दाखल करण्यापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानने वेळोवेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रत्येकवेळी पाकिस्तानच्या पदरी निराशाच पडली आहे.

दरम्यान, दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेने नेहमीच पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानने आपल्या भूमीतील दहशतवादाला आळा घालावा असं आवाहन अमेरिकेकडून अनेकवेळा करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानने दहशवादाला आळा घालण्यापेक्षा  भारतावरच दोषारोप केले आहेत.