America : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर 'एफबीआय'चा छापा; जाणून घ्या कारण

FBI नं छापा टाकला, तेव्हा ट्रम्प फ्लोरिडामध्ये उपस्थित नव्हते.
US Former President Donald Trump
US Former President Donald Trumpesakal
Summary

FBI नं छापा टाकला, तेव्हा ट्रम्प फ्लोरिडामध्ये उपस्थित नव्हते.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US Former President Donald Trump) यांच्या फ्लोरिडा (Florida) येथील मार अ लागो रिसॉर्टवर (Mar a Lago Resort) एफबीआयनं (FBI) छापा टाकलाय. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिलीय.

ट्रम्प यांनी सांगितलं की, एफबीआय अधिकाऱ्यांनी पाम बीचवर असलेल्या मार अ लागोवर छापा टाकून ते ताब्यात घेतलंय. असं सांगण्यात येतंय की, एफबीआय राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत कागदपत्रांचा शोध घेत आहे, त्याचं अनुषंगानं ही कारवाई करण्यात आलीय. फ्लोरिडा येथील ट्रम्प यांच्या पाम बीचवर असलेल्या सुंदर घरावर एफबीआयनं छापा टाकून ते घर अधिकार्‍यांनी ताब्यात घेतलंय. FBI नं छापा टाकला, तेव्हा ट्रम्प फ्लोरिडामध्ये उपस्थित नव्हते.

US Former President Donald Trump
Hindu Doctor : पाकिस्तानच्या हिंदू डॉक्टरांसाठी खुशखबर; भारत सरकारनं केली मोठी घोषणा

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी ही शोध मोहीम सुरू झालीय. अधिकारी ट्रम्प यांचे कार्यालय आणि वैयक्तिक निवासस्थानांवर लक्ष केंद्रित करून शोध घेत आहेत. त्याच वेळी, न्याय विभाग आणि व्हाईट हाऊसनं या प्रकरणी कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाहीय. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात न्याय विभाग दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित पहिले प्रकरण आणि कागदपत्रं हाताळण्यासंदर्भात दुसरं प्रकरण. एप्रिल-मे महिन्यातही तपास यंत्रणेनं याप्रकरणी ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी केली होती.

ट्रम्प म्हणाले, 'आपल्या देशासाठी हा काळा दिवस आहे. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबाबत असं घडलं नव्हतं. तपास यंत्रणांना सहकार्य करूनही असे छापे टाकण्यात येत आहेत. न्याय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर केला जात आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com