

Hindu Temple Attack Plot in Illinois
Esakal
US Hindu Temple Attack: अमेरिकेतील एका राज्यात हिंदू मंदिरात गोळीबारात सामूहिक हत्याकांडाचा कट उधळून लावण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षेय तरुणाला अटक केलीय. मंदिरावर हल्ला करण्याची त्यानं तयारी केली होती. पण मंदिरात गोळीबार करायच्या तयारीत असताना रायफलचा ट्रिगर जाम झाल्यानं आणि सहकाऱ्यानं पोलिसांना कळवल्यानं पुढील अनर्थ टळला असं पोलीस तपासात समोर आलंय. अलेक्झांड्रोस पापोराकिस असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे.