
वॉशिंग्टन : अमेरिकेत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधणाऱ्यांना आता अमेरिकाविरोधी विचारसरणीच्या तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, यामुळे अधिकाऱ्यांना वैयक्तिक अंदाजावरून परकीय नागरिकांना अमेरिकेतील प्रवेश नाकारण्यात अधिक स्वातंत्र्य मिळणार असल्याची टीकाही होत आहे.