US-Iran Deal : जगासाठी दिलासा! अमेरिका-इराण तणाव १०७ दिवसांनी संपला, 'होर्मुझ' पुन्हा खुली होणार, ट्रम्प यांची शांती कराराची घोषणा

Strait of Hormuz Reopening : इराणने तीन प्रमुख अटी मांडल्या आहेत – निधी मुक्त करणे, लष्करी कारवाई थांबवणे आणि नाकेबंदी उठवणे. Pakistan ने मध्यस्थी करत कराराची पुष्टी केली आणि त्वरित शत्रुत्व थांबवण्याचे दोन्ही देश मान्य झाले.
Donald Trump

Donald Trump

esakal

Updated on

Key Terms of the US-Iran Ceasefire and Future Negotiations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे शत्रुत्व संपल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, इराणसोबतचा करार पूर्ण झाला आहे आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. त्यांनी पुढे म्हटले आहे की, आता होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल आणि या भागात अमेरिकन नौदलाने घातलेली नाकेबंदी उठवली जाईल. हा करार शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये अंतिम केला जाणार असून, इराणनेही यासंदर्भात घोषणा केली आहे. करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये ६० दिवसांची युद्धबंदी लागू होईल आणि त्यानंतर अणुकराराबाबत वाटाघाटी सुरू होतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com