

US Iran Nuclear Monitoring
esakal
वॉशिंग्टन: पश्चिम आशियातील प्रदीर्घ संघर्षानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक चर्चेदरम्यान इराणच्या नेतृत्वाने महत्त्वपूर्ण माघार घेतल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराणने आपल्या अण्वस्त्र प्रकल्पांच्या दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक देखरेखीसाठी संमती दिली असल्याचेही ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर मंगळवारी म्हटले आहे. या बदल्यात अमेरिकेकडून ‘होर्मुझ’च्या सामुद्रधुनीतील निर्बंध शिथिल केले जातील आणि अमेरिकेच्या कठोर देखरेखीखाली आर्थिक सवलती दिल्या जातील, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.