

US President Donald Trump reviews revised US-Iran nuclear deal terms during a high-level White House meeting amid rising tensions over uranium control and Hormuz Strait security.
esakal
अमेरिका आणि इराण यांच्यातील दीर्घ प्रतीक्षित करार आता अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र होते, मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मसुद्यातील प्रमुख तरतुदींमध्ये बदल करण्याची मागणी करत नवीन अनिश्चितता निर्माण केली आहे. व्हाइट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये शुक्रवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ट्रम्प यांनी आपल्या अधिकाऱ्यांनीच तयार केलेल्या मसुद्यातील काही महत्त्वाच्या कलामांवर आक्षेप नोंदवला. परिणामी, दोन्ही देशांमध्ये वाटाघाटींची आणखी एक फेरी सुरू झाली आहे.