

US military operations near the Strait of Hormuz
esakal
इराण आणि अमेरिका यांच्यातील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आता केवळ पश्चिम आशियापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे परिणाम अमेरिकेतही स्पष्टपणे दिसून येत आहेत. एका बाजूला अमेरिकन लष्कराचे अत्यंत वरिष्ठ कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी इराणवरील हल्ले थांबवण्याचा सल्ला दिला आहे, तर दुसरीकडे अमेरिकन जनतेचा एक मोठा गट या युद्धामुळे कंटाळलेला दिसत आहे. दरम्यान, जीवितहानीच्या आकडेवारीतील बदल आणि अहवाल सादर करण्याच्या नवीन पद्धतींमुळे पेंटागॉनवर टीकेची झोड उठली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेचा शस्त्रास्त्रांचा साठा वेगाने कमी होत असून ‘थाड’ (THAAD) आणि ‘पॅट्रियट’ (Patriot) सारख्या क्षेपणास्त्रांचा पुरवठाही अपुरा पडत आहे.