
America: इस्रायल आणि इराण या दोन देशातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या पर्वताखाली लपवलेल्या फोर्डो अणुस्थळावर हल्ला करण्यासाठी अमेरिका 'मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर' (MOP) या शक्तिशाली बॉम्बचा वापर करण्याचा विचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराण-इस्रायल संघर्षाला यामुळे नवे आणि गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे.