
इस्रायल इराण युद्धात अमेरिकेनं उडी घेतली असून इराणवर थेट हल्ले केले आहेत. इराणच्या तीन अण्वस्त्र तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या हल्ल्यात सर्वाधिक चर्चा होत आहे ती GBU 57 मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (MOP) बॉम्बची. ट्रम्प यांच्या माहितीनुसार या बॉम्बने फोर्डोसारख्या भक्कम अशा अण्वस्त्र तळांनाही हादरे दिले. हा बॉम्ब काय आहे आणि जगभरात याची भीती का आहे हे जाणून घेऊ.