

No loss of life due to prompt rescue work, 32 injured
Sakal
न्यू ऑर्लिन्स : अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स येथे मिसिसिपी नदीत शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी एक अत्यंत भीषण आणि थरारक जलदुर्घटना घडली. न्यू ऑर्लिन्स बंदरावर उभ्या असलेल्या 'अमेरिकन हेरिटेज' (American Heritage) या पाच मजली प्रवासी क्रूझ बोटीला 'अटलांटिक ॲस्फाल्ट' (Atlantic Asphalt) या १६० मीटर लांबीच्या महाकाय टँकरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अवघ्या १५ मिनिटांतच ही क्रूझ बोट एका बाजूला कलंडून नदीच्या पाण्यात उलटली. या अपघातात ३२ प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.