esakal | 'मानवाधिकार कार्यकर्त्यांचा आदर व्हावा'; स्टॅन स्वामींच्या मृत्यूनंतर अमेरिकेचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Stan-Swamy

'मानवाधिकार कार्यकर्त्यांचा आदर व्हावा'; स्टॅन स्वामींच्या मृत्यूनंतर अमेरिकेचा सल्ला

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाअंतर्गत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कार्यालयाने 84 वर्षीय स्टॅन स्वामींच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. सोबतच त्यांनी भारताकडे आग्रह केलाय की, आरोग्यदायी लोकशाहीसाठी मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या असलेल्या महत्त्वपूर्ण भुमिकेचा सन्मान केला जावा.

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कार्यालयाने (Office of International Religious Freedom) गुरुवारी ट्विट करुन म्हटलंय की, UAPA Unlawful Activities (Prevention) कायद्याच्या आरोपाखाली अटकेत असताना मरण पावलेले आदिवासी हक्क कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनामुळे आम्ही दु: खी आहोत. आम्ही सर्व सरकारांना निरोगी लोकशाहीमध्ये मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आदर करण्याचे आवाहन करतो.

फादर स्टॅन स्वामी एक जेसुआईट प्रिस्ट होते. एनआयएने स्टॅन स्वामी यांना 2018 साली झालेल्या भीमा-कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक केली होती. गेली तीस वर्षे ते झारखंडमध्ये कार्यरत होते. फादर स्टॅन स्वामी हे देशातले सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. तामिळनाडूच्या एका गावात जन्मलेल्या स्टॅन स्वामींनी लग्न केलं नव्हतं. भारत आणि फिलीपिन्समधल्या काही प्रसिद्ध संस्थांमध्ये समाजशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी बंगळुरूतल्या इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं होतं.

loading image