esakal | काश्‍मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Jammu-Kashmir

काश्‍मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार

sakal_logo
By
विनायक होगाडे

श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात सुरक्षा दलाने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले. या धाडसी कारवाईमुळे जम्मू काश्‍मीरचे पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी पोलिस आणि जवानांचे अभिनंदन केले आहे. मृत दहशतवाद्यांत लष्करे तय्यबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनचा एका कमांडरचा समावेश आहे.

हेही वाचा: VIDEO: नवरदेवाला भरमांडवात आईनेच मारलं चपलेनं; कारण ऐकून व्हाल हैराण

पुलवामात काल रात्री चकमक सुरू झाली. घटनास्थळी दोन दहशतवादी असल्याच्या संशयावरून लष्कर आणि पोलिसांनी परिसराला वेढा घातला होता. पुलवामातील पुछाल भागात दहशतवादी लपल्याचे पोलिसांना कळाले होते. यादरम्यान घरात दडून बसलेल्या लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यावेळी लष्कराने त्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. शस्त्र ठेवण्याचे दहशतवाद्यांना सांगण्यात आले. परंतु त्यास दहशतवाद्यांनी प्रतिसाद दिला नाही. याउलट त्यांनी गोळीबार सुरू केला. यात दोन दहशतवादी ठार झाले. तत्पूर्वी कुलगाम पोलिस आणि आरआरच्या जवानांनी कुलगामच्या झोदार भागात केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. तत्पूर्वी हंडवाडा येथे सुरक्षा दलाने हिज्बुलचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईला ठार केले होते.

loading image