
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आयातशुल्काप्रमाणेच व्हिसाबाबतही कठोर भूमिका घेत आहेत. ट्रम्प प्रशासनाने व्हिसाबद्दल एक सरकारी प्रस्ताव बुधवारी (ता.२७) जाहीर केला. त्यानुसार अमेरिकेतील परदेशी विद्यार्थी आणि माध्यम कर्मचाऱ्यांसाठी व्हिसाचा कालावधी मर्यादित करण्यात येणार आहे.