चीनबाबत अमेरिकेचे धोरण अपयशी - रॉबर्ट ओब्रायन

यूएनआय
Sunday, 6 September 2020

गेल्या ४० वर्षांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र धोरण चीनबाबत सर्वाधिक अपयशी ठरले, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटले आहे, ते व्हाइट व्हाउसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धोरण बदलण्यासाठी पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन - गेल्या ४० वर्षांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र धोरण चीनबाबत सर्वाधिक अपयशी ठरले, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटले आहे, ते व्हाइट व्हाउसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धोरण बदलण्यासाठी पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीन श्रीमंत झाल्यानंतर अमेरिकेने चीनच्या चुकीच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. चीनने अमेरिकेचे आयपी ॲड्रेस चोरले. चीनच्या शेजारी देशांना धमक्या देणे, स्वत:च्याच नागरिकांना तियानमेन चौकात धमकावण्यासारख्या गोष्टींकडेही अमेरिकेने दुर्लक्ष केले, असा घरचा आहेरही त्यांनी दिला.  ते पुढे म्हणाले, की जगात प्रत्येक देश अमेरिकेसारखा अधिक लोकशाहीवादी व्हावा, असे अमेरिकेला वाटते. मात्र, त्याच्या विरुद्ध घडले. चीनमध्ये वर्षानुवर्षे मानवाधिकारांचे अधिक उल्लंघन होत आहे. चीनकडून बौद्धिक संपत्तीची एवढी मोठी लूट होत आहे की, अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हिस्टिगेशन या खात्याचे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी चीनने अमेरिकेच्या बौद्धिक संपत्तीच्या लुटीतून पैशांचे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे हस्तांतरण केले, असा आरोप केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US policy on China fails robert obrien