वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षासाठी (Republican Party) गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. त्यांच्या कर कपात आणि खर्च विधेयकाला अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली असून आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्यास हे विधेयक कायद्यात रूपांतरित होणार आहे.