जगभरात मुस्लीम हिंसाचाराचे बळी, अमेरिकेच्या अध्यक्षांचं मोठं विधान

Joe Biden on Muslim Community
Joe Biden on Muslim Communityjoe biden america us

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधवांबद्दल मोठं विधान केलं आहे. जगभरातील मुस्लीम हिंसाचाराचे बळी ठरत आहेत. मुस्लीम बांधव (Muslim Community) समाजातील आव्हानांचा सामना करत असले तरीही अमेरिकेला मजबूत बनवत आहेत, असं बायडन म्हणाले. ईदच्या (Eid) निमित्ताने व्हाईट हाऊसमध्ये बोलताना बाडयन यांनी हे वक्तव्य केलं.

Joe Biden on Muslim Community
भारत स्वतःचे निर्णय घेईल, मोदी-बायडन यांच्या चर्चेनंतर अमेरिकेचं विधान

बायडन म्हणाले की ''त्यांनी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या प्रभारी दूतावासाच्या पदावर प्रथमच एका मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती केली आहे. हे अत्यंत गरजेचे होते. कारण सध्या जगभरात अनेक मुस्लीम हिंसाचाराचे बळी ठरत आहेत. कोणालाही त्यांच्या धार्मिक श्रद्धेसाठी त्रास देऊ नये.'' ईदसारखा पवित्र दिवस उत्साहाने साजरा करू शकत नाही असे लोकही समाजात आहेत. यामध्ये रोहिंग्यांचा समावेश आहे. हे लोक नेहमी दुष्काळ, हिंसाचार, संगर्ष आणि रोगराईने त्रस्त असतात, असंही ते म्हणाले.

मुस्लीम धर्मीयांना आव्हाने आणि धमक्यांचा सामना करावा लागतो. तरी आपल्या देशाच्या विकासात त्यांचं महत्वपूर्ण योगदान असतं. तसेच त्यांनी सर्व मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या पहिल्या महिला बायडनच्या यांच्या पत्नी, मशिदीचे इमाम मोहम्मद डॉ. तालिब एम शरीफ, पाकिस्तानी गायक आणि संगीतकार अरुज आफताब यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही लोकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com