कोरोना रुग्णालयातूनही ट्रम्प करु शकतात जगाचा विनाश; काय आहे 'फुटबॉल'?

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान, त्यांच्यासोबत असलेल्या एका वस्तूने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:सोबत 'न्यूक्लियर फूटबॉल' बाळगला आहे, यामध्ये काही मिनिटात सर्व जगाचा नाश करण्याची क्षमता आहे. कोरोना झाला असतानाही ट्रम्प यांनी 'न्यूक्लियर फूटबॉल' आपल्यापासून दूर केलेला नाही. 

बागेत सापडलेल्या एका वस्तूने केरळला जोडलं थेट रोमन साम्राज्याशी

अमेरिकेच्या राष्ट्रपतींसोबत नेहमी 'न्यूक्लियर फूटबॉल' असतो. याला Presidential Emergency Satchel म्हटलं जातं. त्यांच्यासोबत एक व्यक्तीही असतो, जो आवश्यकता पडल्यास आण्विक हल्ला करण्यासाठी तयार असतो. जेव्हा अमेरिकी राष्ट्रपती व्हाईट हाऊसच्या बाहेर जातात, तेव्हा त्यांच्यासोबत हा फुटबॉल नक्की असतो. 

1962 मध्ये क्यूबन मिसाईल संकट काळात तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांनी आपल्यासोबत हा फुटबॉल बाळगला होता. तेव्हापासून हा फुटबॉल प्रत्येक अमेरिकी राष्ट्रपतीसोबत असतो. अमेरिकी राष्ट्रपतींना प्रत्येकवेळी आण्विक युद्धासाठी तयार ठेवणे याचे उद्धिष्ट आहे. असे एकूण तीन बॅग आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि व्हाईट हाऊसमध्ये ते असतात.  'न्यूक्लियर फूटबॉल'चे रक्षण करण्यासाठी वेगळे कर्मचारी तैनात केलेले असतात. 

ग्लायडर क्रॅश होऊन नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

काय आहे फुटबॉल?

'न्यूक्लियर फुटबॉल'बद्दलची अधिकची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. 'फुटबॉल' ही एक बॅग असते. ही जगातील सर्वात शक्तीशाली बॅग आहे, कारण यामध्ये जगाचा नाश करण्याची क्षमता आहे. यात, अमेरिकेच्या अणु हल्ल्याचा लाँच कोड असतो. म्हणूनचा याला 'न्यूक्लियर फूटबॉल' म्हटलं जातं. या बॅगमधील एका डायरीत अणु हल्ल्याची योजना, टार्गेट याची माहिती लिहिलेली असते. 

बॅगमध्ये आहे एक बिस्किट

आणखी एका काळ्या रंगाच्या डायरीवर हल्ला झाल्यास लपण्याची माहिती देण्यात आली आहे. या बॅगमध्ये एक बिस्किटही असतं. हे खाईचं बिस्किट नसून यावर अणु हल्ल्यासाठी कोड लिहिलेला असतो. बॅगला एक अँटिनाही लावलेला असतो, ज्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष जगातील कोणत्याही भागात संपर्क साधू शकतात. बॅगमध्ये जगाचा नकाशाही असतो, ज्यामुळे हल्ला नेमका कोठे करायचा हे अध्यक्षांना कळतं.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US president donald trump kept football with him in hospital also