डोनाल्ड ट्र्म्प यांचा व्हाइट हाऊसला रामराम; पाहा व्हिडिओ 

trump
trump

वॉशिंगटन - ज्यो बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाऊस सोडलं आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. ट्रम्प आणि मेलानिया हे दोघेही व्हाइट हाउसमधून मरिन वन या हेलिकॉप्टरमधून जॉइंट बेस अँड्र्युजकडे निघून गेले.

एअर फोर्स वनने ते मार ए लागो इस्टेट इथं जाणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी मार ए लागो इथं बराच काळ घालवला आहे. त्याला विंटर व्हाइट हाउस असंही म्हटलं आहे. त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये कायदेशीरपणे ट्रम्प टॉवर ऐवजी मार ए लागो हे निवासस्थान असल्याचं नोंद केलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी 1985 मध्ये एक कोटी डॉलरमध्ये या अलिशान घराची खरेदी केली होती. त्यानंतर एक खासगी क्लब म्हणून सुरू करण्यात आला होता. गेल्या चार वर्षांच्या काळात ट्र्म्प हिवाळ्यामध्ये तिथेच रहायला जात होते. 20 एकर परिसरात असलेल्या या अलिशान घरामध्ये 128 खोल्या आहेत. इस्टेटच्या समोर अटलांटिक महासागराचा किनारा असून क्लबचे सदस्यत्व खरेदी करणाऱ्यांना तिथे प्रवेश दिला जातो. 

ट्रम्प यांना न्यायालयाचा झटका
पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून ट्रम्प प्रशासनाने घेतलेले निर्णय फेडरल न्यायालयाने रद्द करत डोनाल्ड ट्रम्प यांना झटका दिला आहे. ऊर्जा प्रकल्पांसाठी प्रदूषणाचे नियम शिथिल करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय बेकायदा असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे पर्यावरणाबाबत जागरुक असलेल्या बायडेन प्रशासनाला प्रदूषणाबाबत कडक नियम करण्यास आधार मिळणार आहे.
अमेरिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com