ट्रम्प यांचे जाता जाता नखरे; 152 वर्षानंतर पहिल्यांदाच मावळत्या राष्ट्राध्यक्षांचा असा उर्मटपणा

donald trump
donald trump

नवी दिल्ली- डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 जानेवारीला घोषणा केली होती की ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. अमेरिकेमध्ये 152 वर्षानंतर असं होतं आहे की एखादा राष्ट्रपती आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाही. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ 3 राष्ट्रपतींनी आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली नाही. सर्वात आधी जॉन ऐडम्स यांना शपथविधी सोहळा टाळला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र जॉन क्वींसी ऐडम्स आणि नंतर अँड्रू जॉनसन राष्ट्रपतीच्या शपथविधीला गैरहजर होते. 

जॉन ऐडम्स यांनी संयुक्त राज्य अमेरिकेचे पहिले उपाध्यक्ष आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून सेवा दिली आहे. 1800 सालची निवडणूक फेडरलिस्ट पार्टीचे जॉन ऐडम्स आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे थॉमस जेफरसन यांच्यामध्ये झाली होती. यात जेफरसन यांचा विजय झाला होता. तरी जॉन यांनी जेफरसन यांना कार्यभार देण्यास नकार दिला होता. 

जॉन क्वींसी ऐडम्स (1829)

1825 ते 1829 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्रपती राहिलेले जॉन क्विंसी ऐडम्स आणि त्यावेळी निवडणुकीच्या शर्यतीत असणारे एँड्रू जॅकसन यांच्यामधील तणाव शिगेला पोहोचला होता. त्यावेळी कोणत्याही उमेदवाराला पॉप्युलर वोटमध्ये बहुमत मिळाले नव्हते. शेवटी यूएस हाऊसने जॅकसन यांना विजयी घोषित केले. ऐडम्स यांनी शपथविधी सोहळ्याच्या 3 दिवस आधीच वॉशिंग्टन सोडलं होतं. 

एँड्रू जॉनसन

एँड्रू जॉनसन, पहिले अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत, ज्यांच्यावर महाभियोग चालवून पदावरुन हटवण्यात आलंय. एँड्रू जॉनसन यांनी 152 वर्षांपूर्वी आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधी वेळी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला होता. जॉनसन पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू पाहात होते, पण त्यांना डेमोक्रॅटने उमेदवारी दिली नव्हती. 

नव्या वर्षात यशस्वीरित्या करिअर बदलण्याच्या 5 महत्त्वाच्या टिप्स; जाणून घ्या...

जो बायडन आज घेणार शपथ

जो बायडन आज अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षाच्या स्वरुपात शपथ घेणार आहेत. जगातील महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या संयुक्त राज्य अमेरिकेची सत्ता बुधवारी अधिकृतरित्या रिपब्लिकन पक्षाकडून डेमोक्रॅटीक पक्षाकडे जाणार आहे. जो बायडन अमेरिकेचे सर्वांत वयस्कर तसेच 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. या शपथविधीच्या अनुषंगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी कडक सुरक्षा तैनात केली गेली आहे. गेल्या 6 जानेवारी रोजी ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल हिलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या शपथविधीवर धोक्याचं सावट आहे. त्यामुळे हरतर्हेने खबरदारी घेतली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com