US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Trump ultimatum Iran: पश्चिम आशियातील युद्धात सुरू असलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 'सलोखा किंवा विनाश' यापैकी एक निवडण्याचा पर्याय देत एक गंभीर इशारा दिला आहे.
Trump ultimatum Iran

Trump ultimatum Iran

ESakal

Updated on

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत इराणला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. रविवारी एकाच निवेदनातून ट्रम्प यांची दोन भिन्न भूमिका स्पष्ट झाल्या. एका बाजूला त्यांनी इराणची संपूर्ण पायाभूत सुविधा नष्ट करण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या बाजूला, पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी एका न्याय्य आणि वाजवी कराराचा प्रस्ताव मांडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com