

US Iran Relations
ESakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी इराणसोबतच्या करारासंदर्भात एक मोठी घोषणा केली. 'ट्रुथआउट' या सोशल साईटवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत करार होत नाही, त्याला मान्यता मिळत नाही आणि त्यावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत नाकेबंदी पूर्णपणे लागू राहील. दोन्ही बाजूंनी पुरेसा वेळ घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. कोणतीही चूक होता कामा नये. चर्चा चांगल्या प्रकारे आणि सुरळीतपणे सुरू आहेत आणि जोपर्यंत वेळ योग्य आहे, तोपर्यंत कोणताही करार करण्याची घाई करू नका, असे मी माझ्या प्रतिनिधींना सांगितले आहे.