अमेरिकेचा मोदी सरकारला मोठा झटका; काढला 'हा' दर्जा

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जून 2019

काय आहे जीएसपी?
अमेरिकेकडून व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी इतर देशांना सीमाशुल्कात सूट देण्यात येते. अनेक उत्पादनांवर काही देशांना जीएसपी अंतर्गत सूट देण्यात येते. अमेरिकेला भारताकडून निर्यात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर ही सूट मिळत होती. आता हे सर्व बंद होणार आहे. 2017 मध्ये या दर्जामुळे भारताला सर्वाधिक फायदा झाला होता. भारताने 2017 मध्ये अमेरिकेला 5.7 अब्ज डॉलरची निर्यात केली होती.

न्यूयॉर्क : दोन दिवसांपूर्वीच पुन्हा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अमेरिकेने मोठा झटका दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा जीएसपी (जनरेलाईज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्स) अंतर्गत मिळणारा व्यापारासाठीचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प यांनी याबाबतची घोषणा चार मार्चला रोजीच केली होती. भारताला जीएसपीमधून बाहेर काढण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर 60 दिवसांच्या नोटिशीनंतर तीन जून रोजी भारताचा हा दर्जा जाणार आहे. आता कोणत्याही क्षणी याबाबतची औपचारिक घोषणा करण्यात येईल.

काय आहे जीएसपी?
अमेरिकेकडून व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी इतर देशांना सीमाशुल्कात सूट देण्यात येते. अनेक उत्पादनांवर काही देशांना जीएसपी अंतर्गत सूट देण्यात येते. अमेरिकेला भारताकडून निर्यात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर ही सूट मिळत होती. आता हे सर्व बंद होणार आहे. 2017 मध्ये या दर्जामुळे भारताला सर्वाधिक फायदा झाला होता. भारताने 2017 मध्ये अमेरिकेला 5.7 अब्ज डॉलरची निर्यात केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Donald Trump Terminates Preferential Trade Status For India Under GSP