लोकशाहीवर परिषदेसाठी अमेरिकेचे भारताला आमंत्रण; ११० देशांमधून चीनला वगळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

joe biden america us

लोकशाहीवर आयोजित या व्हर्च्युअल समिटचे आमंत्रण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ११० देशांना पाठवलं आहे.

लोकशाहीवर ऑनलाइन परिषद; अमेरिकेकडून ११० देशांना आमंत्रण

अमेरिकेने ९ ते १० डिसेंबर या कालावधीत आय़ोजित केलेल्या व्हर्च्युअल समिटमध्ये ११० देशांना आमंत्रित केलं आहे. लोकशाहीवर आयोजित या व्हर्च्युअल समिटचे आमंत्रण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ११० देशांना पाठवलं आहे. मात्र यामध्ये काही देशांना वगळण्यात आलं आहे. नुकतीच बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात साडेतीन तास चर्चा झाली होती. पण लोकशाहीवर आय़ोजित व्हर्च्युअल समिटमध्ये चीनला आमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही.

बायडेन यांनी भारतासह इराक आणि पाकिस्तानला आमंत्रण दिलं आहे. मध्य पूर्वेकडील फक्त इस्रायल आणि इराकला या ऑनलाइन कॉन्फरन्ससाठी बोलावण्यात आलं आहे. जैर बोल्सोनारो हे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक होते तरी बायडेन यांनी बोल्सोनारो यांना यासाठी आमंत्रित केलं आहे. तर इजिप्त, सौदी अरेबिया, जॉर्डन, कतार, युएईला वगळण्यात आलं आहे.

एकीकडे चीनला वगळले असताना तैवानाला मात्र या समिटसाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. चीनशिवाय नाटोचा सदस्य असणाऱ्या तुर्कीलाही या यादीतून वगळण्यात आलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने ११० देशांची यादी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार अमेरिकेच्या ११० देशांच्या यादीत रशियालासुद्धा वगळले आहे. याशिवाय दक्षिण आशियातील अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांना वगळलं आहे.

loading image
go to top