आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकावर ज्यो बायडेन यांची स्वाक्षरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकावर ज्यो बायडेन यांची स्वाक्षरी

आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकावर ज्यो बायडेन यांची स्वाक्षरी

sakal_logo
By
विनायक होगाडे

वॉशिंग्टन : अमेरिकेतील बायडेन (US President Joe Biden) सरकारने आज आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकास (anti Asian hate crime) मान्यता दिली. या ऐतिहासिक विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर ज्यो बायडेन यांनी वर्णद्वेषाविरोधात सर्वच सदस्य एकत्र येणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांनी याबद्दल डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन (Mr. Biden praised Democrats and Republicans for approving the bill) पक्षाच्या सदस्यांचे मनापासून कौतुक केले. अनेक सदस्य समर्थपणे या विधेयकाच्या बाजूने उभे राहिले त्यांचे हे कृत्य कौतुकास्पद असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. (US President Joe Biden signs bill to counter spike in anti Asian hate crime)

या विधेयकाच्या स्वाक्षरी समारंभाला अमेरिकी संसदेतील अनेक सदस्य उपस्थित होते. मागील आठवड्यात प्रतिनिधीगृहामध्ये हे विधयेक ३६४ विरुद्ध ६२ मतांनी मंजूर झाले होते तर अमेरिकी सिनेटमध्येही एप्रिल महिन्यात त्यावर ९४ विरुद्ध १ अशा मतांनी मान्यतेची मोहोर उमटविण्यात आली होती. आजच्या कार्यक्रमामध्ये बोलताना बायडेन भावुक झाले होते. मला अमेरिकेचा खरोखरच अभिमान वाटतो असे सांगत त्यांनी वर्ण आणि वंशद्वेषाच्या विरोधातील लढ्यातून लोकांनी एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा: 'जय हो कोरोना मैया'; देशात उभारलं कोरोना देवीचं मंदिर

हेही वाचा: आमची लस आमचा फोटो; मोदींचा चेहरा कशाला? ही राज्ये झाली आक्रमक

तपासाला वेग येणार

नव्या कायद्यामुळे वर्णद्वेषाच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार असून न्याय विभागाचे अधिकार देखील त्यामुळे आणखी वाढतील. तसेच या बदलामुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या तपास संस्थांच्या चौकशी प्रक्रियेमध्ये वेग येणार आहे. आतापर्यंत या तपासाला फारसे महत्त्व दिले जात नसे. दरम्यान या नव्या विधेयकामुळे तपास संस्थांचे महत्त्व वाढणार असल्याने त्याला काहींनी त्याला विरोध केला होता.

loading image
go to top