अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प भारतभेटीवर

पीटीआय
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे याच महिन्यात दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार असून २४ फेब्रुवारीपासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल, अशी माहिती व्हाइट हाउसकडून देण्यात आली. ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे उभय देशांतील रणनितीक संबंध दृढ होतील, असा विश्‍वासही व्यक्त करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्यासोबत फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यादेखील असतील, असे माध्यम सचिव स्टेफने ग्रीष्म यांनी सांगितले.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे याच महिन्यात दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार असून २४ फेब्रुवारीपासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल, अशी माहिती व्हाइट हाउसकडून देण्यात आली. ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे उभय देशांतील रणनितीक संबंध दृढ होतील, असा विश्‍वासही व्यक्त करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्यासोबत फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यादेखील असतील, असे माध्यम सचिव स्टेफने ग्रीष्म यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘या आठवड्याच्या शेवटीच ट्रम्प आणि मोदी यांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले होते, यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये या दौऱ्याबाबत चर्चा देखील झाली होती, द्विपक्षीय रणनितीक संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच उभय देशांतील जनतेत असणाऱ्या मजबूत अशा संबंधांचाही यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊहापोह केला होता,’’ असेही ग्रीष्म यांनी म्हटले आहे.

गुजरातला भेट
भारत दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे मेलानिया यांच्यासोबत नवी दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास करतील, पंतप्रधान मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातचे महात्मा गांधी यांच्या जीवनातदेखील महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या नेत्यांची जडणघडणही तेथेच झाल्याचे व्हाइट हाउसने म्हटले आहे. ट्रम्प यांच्याआधी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१० आणि २०१५ मध्येही भारताला भेट दिली होती. याआधी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४ व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेथेही त्यांची ट्रम्प यांच्याशी भेट झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Trump to visit India