चुकीचे चित्र सादर करण्याचे प्रयत्न,रशियाची भारतीय मीडियावर नाराजी | Russia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india china conflict russia says will supply s 400 missile next year

चुकीचे चित्र सादर करण्याचे प्रयत्न,रशियाची भारतीय मीडियावर नाराजी

नवी दिल्ली : सध्या युक्रेन (Ukrain) आणि रशियाच्या दरम्यान पुन्हा एकदा तणाव वाढत चालला आहे. मात्र रशियाने या तणावादरम्यान भारतीय मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. याचे कारण युक्रेनबरोबर रशियाचे तणावबाबत भारतीय मीडियात वार्तांकन करण्यात आले आहे. यामुळे माॅस्को नाराज आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय मीडियात कझाकिस्तान आणि युक्रेन याबाबत पूर्ण सत्य सांगितले जात नाही. युक्रेनने दावा केला की रशियाने जवळपास ९० हजार सैनिक सीमेवर तैनात करण्यात आले आहे. दुसरीकडे अमेरिकन गुप्त अहवालात म्हटले आहे, की रशिया (Russia) कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करु शकतो. अमेरिकेच्या या दाव्याला आधार मिळतो, की रशियाने वर्ष २०१४ मध्ये युक्रेनच्या सीमावर्ती भागात क्रायमियावर लष्करी कारवाई करुन ताबा मिळविला होता.(Russia Express Unhappiness With Indian Media Reports Over Ukrain)

हेही वाचा: omicron : वाढत्या संसर्गामुळे ब्रिटन चिंतेत; ओमिक्रॉन ३८ देशांत पसरला

भारतातील रशियाचे दुतावासने या संबंधात एक सविस्तर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. मात्र यात कोणत्याही विशेष मीडिया रिपोर्ट किंवा मीडिया कंपनीचा उल्लेख नाही. पंरतु दावा केला आहे, की भारतीय मीडियात युक्रेन आणि रशियाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार चुकीचे चित्र दाखवण्याचे प्रयत्न केले गेले आहे. अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन रशियाच्या दुतावासने ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे, फारच दुःखद आहे की काही भारतीय मीडिया रिपोर्ट्समध्ये पुन्हा एकदा युक्रेनच्या अंतर्गत संकटाची स्थितीवरुन चुकीचे चित्र सादर करण्याचे प्रयत्न केले गेले आहे. यात रशियाचा दृष्टीकोन विपरित दाखवले गेले आहे. त्यात युक्रेनचे अधिकाऱ्यांकडून दिले गेलेले अपमानजनक दाव्यांचाही समावेश आहे. आम्हाला वाटते की या एकतर्फी बातम्यांचा भारत सरकारच्या अधिकृत धोरणाशी काही संबंध नाही. आम्ही काही गोष्टींबाबत धोरण स्पष्ट करु इच्छितो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Russia
loading image
go to top