पराभवानंतर ट्रम्प यांचा भारताला धक्का; 9 कंपन्यावर घातली बंदी; व्यावसायिक दाम्पत्य टार्गेटवर

US Sanctions Indian Couple and Nine Firms ट्रम्प प्रशासनाने भारतातील एका व्यावसायिक दाम्पत्यासह नऊ कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. इराणच्या प्रतिबंधित तेल व्यापाराला मदत केल्याचा आरोप या दाम्पत्यावर आहे.
donald trump

donald trump

Esakal

Updated on: 

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. निकालानंतर वातावरण तापलं असतानाच ट्रम्प प्रशासनाने भारतातील एका व्यावसायिक दाम्पत्यासह नऊ कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. इराणच्या प्रतिबंधित तेल व्यापाराला मदत केल्याचा आरोप या दाम्पत्यावर आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या तेल वाहतुकीत बनावट नोंदणी आणि प्रमाणपत्रांचा वापर करून आंतरराष्ट्रीय निर्बंधातून पळवाट काढण्यास मदत केल्याचा दावा अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने केला आहे.

Loading content, please wait...