Russia Ukraine War | अमेरिकेने पुतिन यांच्या मुलींवर घातले निर्बंध

us sanctions Russia president Vladimir putin daughters over ukraine attack
us sanctions Russia president Vladimir putin daughters over ukraine attack Sakal

युक्रेनवर रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातून रशियावर निर्बंध लादले जात आहे. रशियन कंपन्या आणि अधिकाऱ्यांवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन्ही मुलींवर निर्बंध घातले आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या इतर निर्बंधात वाढ केली आहे. तसेच काही रिपोर्टनुसार, युरोपियन युनियन देखील पुतिन यांच्या मुलींवर बंदी घालण्याच्या विचारा आहे. पुतीन यांना मारिया वोरोंत्सोवा कातेरिना तिखोनोवा अशा दोन मुली आहेत.

दरम्यान पुतिन यांच्या कुटुंबियांवर बंदी घातल्यानंतर त्यांच्यावरील दबाव वाढणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, त्याच्या मुलींची रशियाबाहेर काही मालमत्ता आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुतिन यांनी त्यांच्या मुलींची माहिती अत्यंत गुप्त ठेवली आहे. असे म्हटले जाते की त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते आणि पुतिन यांनी कधीही त्यांच्या मुलींच्या नावे कन्फर्म केली नाहीत. तसेच पुतिन यांच्या मुलींचे कोणतेही अधिकृत फोटो प्रसिद्ध झाले नाहीत.

पुतीन यांच्या मुलींसह अमेरिकेने रशियन बँकांवरही निर्बंध वाढवले आहेत. युक्रेनची राजधानी किव्हमध्ये रशियन सैन्याने नरसंहार केला होता. यामध्ये 410 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या गंभीर विषयावर UNSC मध्येही चर्चा झाली. यावेळी अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, रशियन सैन्याने लोकांना रणगाड्यांखाली चिरडले. रशियन सैन्याने महिलांवर मुलांसमोर बलात्कार केल्याचा आरोपही त्यांनी केला. यानंतर, असे सांगण्यात येत आहे की EU देखील रशियावर अतिरिक्त निर्बंध लादू शकते.

us sanctions Russia president Vladimir putin daughters over ukraine attack
शिवसेनेचं मुंबईत उद्या शक्तिप्रदर्शन; राऊतांचं होणार स्वागत

पुतीन यांच्या मुलींबद्दल सांगायचे तर, या दोघींनी रशियाच्या विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्यांना अनेक भाषांचे ज्ञान आहे. रिपोर्ट्सनुसार, पुतिन यांची मोठी मुलगी एक कंपनी चालवते. ही आरोग्यसेवा संबंधित कंपनी आहे. तर दुसरी मुलगी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट चालवते. रशियामध्ये पुतीन यांच्या मुलींबद्दल मीडिया कव्हरेजला परवानगी नाही, असे म्हटले जाते.

us sanctions Russia president Vladimir putin daughters over ukraine attack
कोरोनाचा व्हेरिएंट XE भारतात दाखल! जाणून घ्या नेमकी काय आहेत लक्षणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com