पाकची सर्व 'एफ-16' विमाने सुस्थितीत 

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

"फॉरेन पॉलिसी' मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात लारा सेलिग्मन यांनी म्हटले आहे, की अमेरिकी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये पाकिस्तानला देण्यात आलेली सर्व "एफ-16' विमाने सुस्थितीत आहेत. पाकिस्तानचे एक "एफ-16' विमान पाडल्याचा दावा भारताने केल्यानंतर अमेरिकेकडून पाहाणी करण्यात आली होती. 

वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली सर्व "एफ-16' लढाऊ विमाने सुस्थितीत असल्याचा दावा अमेरिकेतील "फॉरेन पॉलिसी' या मासिकाने केला आहे. याबाबत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे एक "एफ-16' लढाऊ विमान पाडल्याचा दावा भारताकडून करण्यात आला होता. 

"फॉरेन पॉलिसी' मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात लारा सेलिग्मन यांनी म्हटले आहे, की अमेरिकी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये पाकिस्तानला देण्यात आलेली सर्व "एफ-16' विमाने सुस्थितीत आहेत. पाकिस्तानचे एक "एफ-16' विमान पाडल्याचा दावा भारताने केल्यानंतर अमेरिकेकडून पाहाणी करण्यात आली होती. 

"सविस्तर माहिती समोर आल्यामुळे भारतापुढील अडचणी वाढल्याचे दिसून येते. यातून पाकिस्तानचे मोठे नुकसान करण्यात भारताला अपयश आल्याचे दिसून येते आहे. त्याच वेळी भारताला एक लढाऊ विमान आणि एक हेलिकॉप्टर गमवावे लागले आहे,'' अशी प्रतिक्रिया "एमआयटी'चे प्राध्यापक विपीन नारंग यांनी मासिकाशी बोलताना दिली. 

काश्‍मीरमधील भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकी बनावटीच्या "एफ-16' या लढाऊ विमानांचा पाकिस्तानकडून वापर करण्यात आला होता, असा दावा भारतीय हवाई दलाने 28 फेब्रुवारी रोजी केला होता. त्याचे पुरावे म्हणून "ऍमरॅम' क्षेपणास्त्राचे काही अवशेष भारतीय हवाई दलाकडून सादर करण्यात आले होते. तसेच पाकिस्तानचे एक "एफ-16' विमान पाडण्यात आल्याचा दावा भारतीय हवाई दलाकडून करण्यात आला होता. पाकिस्तानने मात्र भारताचा दावा फेटाळून लावला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Says Count of Pakistans F-16 Jets Found None of Them Missing Contradicts Indias Claim