पॉम्पिओकृत ट्रम्पस्तुतीने वाद;परदेश दौऱ्यावर असूनही व्हिडिओद्वारे भाषण

वृत्तसंस्था
Thursday, 27 August 2020

 अध्यक्षपदी फेरनिवडीसाठी ट्रम्प निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शविताना पॉम्पिओ यांनी अमेरिकेच्या शत्रूंना लक्ष्य केले. चिनी कम्युनिस्ट पक्षाची लुटारू आक्रमकता ट्रम्प यांनी उघडकीस आणली.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी परदेश दौऱ्यावर असूनही डोनाल्ड ट्रम्प यांची वारेमाप स्तुती करणारा व्हिडिओ जारी केला. रिपब्लीकन पक्षाच्या अधिवेशनासाठी त्यांनी केलेल्या या खास नियोजनामुळे वाद निर्माण झाला आहे.

पॉम्पिओ आखाती देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. जेरुसलेम येथे मुक्काम असलेल्या इमारतीच्या गच्चीवरून त्यांनी केलेल्या भाषणाची चित्रफित दाखविण्यात आली. त्यांचे बोलणे सुरू होण्यापूर्वीच टीकाकारांनी नापसंती दर्शविली. त्यांनी आपल्या पदाचा पक्षपाती कारणांसाठी गैरवापर करून अनेक दशकांचा शिष्टाचार मोडला असा आक्षेप घेण्यात आला. पॉम्पिओ यांनी स्वतः भविष्यात अध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा बाळगल्याची चर्चा आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अध्यक्षपदी फेरनिवडीसाठी ट्रम्प निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शविताना पॉम्पिओ यांनी अमेरिकेच्या शत्रूंना लक्ष्य केले. चिनी कम्युनिस्ट पक्षाची लुटारू आक्रमकता ट्रम्प यांनी उघडकीस आणली. त्यांनी इस्लामीक स्टेटच्या दहशदवाद्यांचा पराभव केला, तसेच उत्तर कोरियाचा धोका कमी केला, असे दावेही त्यांनी केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, पॉम्पिओ यांनी शिष्टाचाराचा भंग केला असल्याचे संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या देखरेख उपसमितीचे प्रमुख ज्योकीन कॅस्ट्रो यांनी सांगितले. याविषयी त्यांनी परराष्ट्र उपमंत्री स्टीफन बिगन यांना पत्र लिहिले आहे. पॉम्पिओ यांची कृती अत्यंत अनपेक्षित आणि कदाचित बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प प्रशासन आणि पॉम्पीओ यांनी मुलभूत तत्त्वांशी प्रचंड प्रतारणा केली आहे. राजकीय स्वार्थासाठी सरकारी कायदा धाब्यावर बसविण्याची उघड कृती करतानाही त्यांनी तमा बाळगलेली नाही.
- ज्योकीन कॅस्ट्रो, परराष्ट्र उपसमिती प्रमुख

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Secretary of State Mike Pompeo releases video praising Donald Trump