Russia-Ukraine War : अमेरिकेकडून युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रं पाठवण्यास सुरुवात; मीडियाचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

US Department of Defense

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपताना नाव घेत नाहीय.

अमेरिकेकडून युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रं पाठवण्यास सुरुवात; मीडियाचा दावा

Russia-Ukraine War News : सहा महिन्यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर हल्ला केला आणि या हल्ल्यात युक्रेन तीन ते चार दिवसांत गुडघे टेकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पुतीन यांनी तिन्ही बाजूनं युक्रेनला घेरत राजधानी किव्हपर्यंत मजल मारत अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र, युक्रेन मागील सहा महिन्यांपासून पाश्चिमात्य देशांनी पुरवलेली आर्थिक गंगाजळी आणि युद्ध सामाग्रीवर रशियाशी लढा देत आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia and Ukraine War) संपताना नाव घेत नाहीय. युक्रेनच्या सैन्याला (Ukraine Army) अमेरिका अधिक शस्त्रं पुरवत आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या (Washington Post) वृत्तानुसार, अमेरिकेच्या संरक्षण विभागानं (US Department of Defense) युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रास्त्रांची खेप पाठवण्यास सुरुवात केलीय. ही जहाजं मोठ्या प्रमाणात शस्त्रं वाहून नेण्यास सक्षम असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. अर्थातच, त्यांचा वेग विमानापेक्षा कमी आहे.

हेही वाचा: शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्षश्रेष्ठींना सल्ला

अमेरिकेच्या या मदतीमुळं युक्रेनचा शस्त्रसाठा आणखी वाढणार आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस रशियानं युक्रेनमध्ये विशेष लष्करी (Russian Army) कारवाई सुरू केली. अमेरिकन संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितलं की, काही आठवड्यांनंतर पेंटागॉननं युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रं पाठवण्यास सुरुवात केली. मात्र, अलीकडच्या काळात सागरी जहाजांद्वारे मदत पोहोचवण्याचं प्रमाण वाढलंय. आर्मीचे कर्नल स्टीव्हन पुथॉफ म्हणाले, 'आम्हाला माहित होतं की एकदा आम्ही शस्त्रं द्यायला सुरुवात केली की, त्याची आणखी गरज भासणार आहे.'

हेही वाचा: शिवसेनेत मोठे फेरबदल; ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणाऱ्या सावंत, भास्कर जाधवांना मिळालं 'प्रमोशन'

अमेरिकेचा युक्रेनला मदतीचा हात

यूएस संरक्षण विभागानं यापूर्वी घोषणा केली होती की, ते युक्रेनला HIMARS क्षेपणास्त्रं, तोफखाना आणि माइन क्लिअरिंग सिस्टमसह $775 दशलक्ष अतिरिक्त लष्करी मदत प्रदान करेल. या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेनं युक्रेनसाठी 2.98 अब्ज डॉलर्सच्या लष्करी मदतीचं नवीन पॅकेज जाहीर केलं. त्याच वेळी, अमेरिकेच्या संरक्षण उद्योगानं काही शस्त्रास्त्रांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याबाबतही बोललं आहे.

Web Title: Us Sending More Weapons Ukraine Maritime Routes Russia Army Atom Security American Media Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..